तुझे आहे तुझपाशी


मित्रहो
असेच इतिहासाचे काही उल्लेख वाचतांना या एका इंग्रज अधिकाऱ्याची ओळख झाली. आर्थर वेलस्ली (Arthur Wellesley)
कोण होता हा आर्थर वेलस्ली?
हा माणूस ब्रिटीशांची शान होता. हा वेलस्ली इंग्रजांचा सर्वात चाणाक्ष सेनापती होता म्हणे. ब्रिटनचा पंतप्रधान म्हणून वेलस्ली याचे नाव प्रसिद्ध आहे.
याच वेलस्ली ने टिपू सुलतान चा पराभव केला होता. आणि शेवटी कुठल्याच सैनिकाची टिपू सुलतान च्या प्रेताजवळ जायची हिम्मत होत नव्हती तेव्हा स्वतः जाऊन टिपू सुलतान ची नाडी तपासून त्याला मृत घोषित केले होते.
याच वेलस्ली ने सर्वात शेवटी मराठ्यांचा आष्टी, जालना येथे पराभव करून, शेवटचा आणि सर्वात प्रबळ असा विरोध मोडून काढला होता.आष्टी येथील लढाई
असा हा वेलस्ली. आता कुणीतरी म्हणेल त्याचं आपल्याला कशाला कौतुक? अहो पण खरी गोष्ट पुढे आहे.
भारता मध्ये अनेक पराक्रम करून नंतर त्याने आपला मोर्चा युरोप मध्ये वळवला आणि पराभव ज्या माणसाच्या शब्दकोशातच नाही असा ज्याच्याविषयी म्हटलं जायचं ना त्या नेपोलियन ला त्याने हरवलं. फक्त हरवलंच नव्हतं तर कायमचं घरी बसवलं होतं. वेलस्ली ने जेव्हा स्वताचे आत्मचरित्र लिहायला दिले होते त्या मुलाखतीत त्याने नमूद केले आहे कि त्याने नेपोलियन ला हरवले पण त्याच्या कायमची लक्षात राहील ती लढाई होती मराठ्यांविरुद्ध. याच लढायीत तो म्हणतो कि अक्षरशः मृत्यू आला होता पण कुण्या रिचर्ड शार्प या सहकाऱ्याने जीव वाचवला म्हणून वाचला.

तो म्हणतो मराठ्यांचे युद्ध तंत्र आणि जिद्द नेपोलियन च्या सैनिकांकडेही नव्हती आणि ज्या पद्धतीने मराठे लढत होते ते बघून मी खरच हरतो आहे असे वाटत होते. पण मराठ्यांकडे आधुनिक शस्त्रांची कमतरता होती आणि आमच्या सैन्याकडे भरपूर अत्याधुनिक शस्त्र असल्याने आमचा विजय झाला. जर मराठी सैनिकांकडे नेपोलियन च्या सैनिकांसारखे सामुग्री असती तर त्यांनी कधीच इंग्रज सैनिकांना घरी पाठवले असते.
आता कुणीतरी म्हणेल कि या इतिहासातल्या जुन्या घटनांना कोरून काय उपयोग हे सर्व इतिहास जमा झाले आहे.
पण मित्रांनो,
आज आपल्या चहू बाजूला पहिले कि दिसते आपला स्वतःवरचा विश्वासच उडाला आहे. आदर्श म्हणून कुणाकडे पाहावं तेच कळत नाही. आपण आदर्शासाठी इतर देशांकडे बघतो आहे. आपण दुसऱ्या देशातील मोठ मोठ्या कंपन्याच्या जाहिरातीला बळी पडून त्यांच्या तालावर नाचतो आहोत. आपण काय वाचावं, काय विचार करावा हे सुद्धा आता या कंपन्या आणि वेबसाइटस ठरवत आहेत. आपले विचार हे फक्त विदेश धार्जिणे बनत चालले आहेत आणि नकळत आपण भारतात राहणारे परदेशी बनतो आहोत.
मित्रांनो आपल्याला Plato, Socrates, Shakespeare जास्त माहित आहेत आणि त्यांच्या विषयी चर्चा करायला आपल्याला आनंद वाटतो, पण आपण आपल्या ज्ञानेश्वरांना, तुकोबारायांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का? थोडा वेळ देवूयात आणि ज्ञानेश्वरीची एखादी ओवी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अहो ज्ञानेश्वरी किंवा गाथा जर आपण मार्गदर्शक म्हणून आपल्या आयुष्यात आणल्या तर मला नाही वाटत आपल्याला कुठल्या विदेशी self help book ची गरज लागेल. फक्त एकदा विवेकानंदाचे कुठलेही वेदांतावरचे पुस्तक घ्या आणि काही पाने वाचून काढा. स्वामी म्हणतात : “ज्याचा स्वतःवरती विश्वास आहे तोच माझ्या दृष्टीने आस्तिक, नाहीतर नास्तिक.” अहो किती महत्वाचं आहे हे सगळं. आपल्या वेदांताचे तत्वज्ञान किती सोपे करून सांगितले आहे. मग कशाला हवीत आम्हाला विदेशी self help पुस्तकं?
मित्रांनो माझ्या सारासार विवेक बुद्धीला एवढेच समजते आहे कि, आपण कमी पडलो ते फक्त marketing मध्ये. आपल्याकडचे साहित्य, आपले पूर्वज, आपले विज्ञान हे तितकेच प्रबळ आहेत फक्त आपली marketing कमी पडली असे मला वाटते. नेपोलियन या नावाला इतके भव्य करण्यात आले कि आपल्या मनात लहान पणापासून त्याच्याविषयी कितीतरी (गैर)समज कोंबले गेलेत. अहो आपला शिवाजी, बाजीराव आणि कितीतरी नावे हे जागतिक इतिहासात महत्वाची नावे असायला हवीत पण आपल्याला जागतिक पात्रतेचे म्हणून सांगितले जातात ते Alexander, Napoleon इत्यादी.
हे सर्व लिहिण्याचा हेतू इतकाच कि आपल्या प्रत्येकाला वाटते कि आपला देश प्रगती करत राहावा. सर्व बाबतीत आपण पुढे असावे. भ्रष्टाचार मुक्त, सबळ, साक्षर, समान समाज रचना असावी. पण त्या दृष्टीने आपले कर्तव्य आपण सरळ सरळ विसरतो. आणि मग उगीचच इतर देशांबरोबर तुलना करत राहतो. आणी त्यांना आपल्या पेक्षा श्रेष्ट असा (गैर) समज करून घेतो.
मित्रांनो फक्त प्रबळ राष्ट्रवाद आणि स्वतःवरचा विश्वास यांच्या बळावरच आपण प्रगती करू शकू. आपण जर स्वतःवरती विश्वास ठेवला तरच जग आपल्यावरती विश्वास ठेवेल.
आता इतकेच सांगणे “तुझे आहे तुझपाशी, परी तू जागा चुकलासी”

Advertisements

6 Comments

 1. पूर्णपणे सहमत आहे मी. आपल्याला marketing करणे जमलेच नाही. आणि आपल्या येणाऱ्या पिध्यांवर देखील आपण बाहेरच्या संस्कृतीचा खोटा चष्मा चढवतो आहे. निदान अजून तरी आपण ह्या गोष्टींचा विचार करून पाश्चात्यीकरण थांबवले पाहिजे.
  तू नक्कीच ‘एका दिशेचा शोध’ हे संदीप वस्लेकारांचे पुस्तक वाचले पाहिजे आणि कदाचित असणारही.

  Reply

 2. सागर
  एका दिशेचा शोध हे पुस्तक मी प्रकाशित होण्याच्या आधीच book करून ठेवले होते आणि त्या पुस्तकाचा माझ्या विचारांवर फार मोठा परिणाम झाला आहे. प्रत्येक भारतीयाने वाचावेच असे आहे.
  मला फार छान वाटले की तू ते वाचले आहेस.

  Reply

 3. मस्त लिहला आहे .. आणि हे तितकाच खर देखिल आहे..

  Reply

 4. Dear Amol,
  Realy very good topic discussed & explore by you. It will happen only after introspection. I want talk with you on mobile or discuss personally on such important issues.
  Sudhakar.

  Reply

 5. अमोल,
  मनातल्या गोष्टी अश्याच लिहित जा. त्या निश्चीतच सर्वांना आनंद देतील. मनाच्या गाभाऱ्यात अनेक गोष्टी दडलेल्या असतात, शांत राहिल्यास संतानी सांगितल्या प्रमाणे ध्यान केल्यास अजून खूप खूप चांगल्या अनुभवांची प्रचीती येईल.
  तू लिहित जा.

  Reply

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s