सुखाच्या शोधात


खुप वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आणि कितीतरी कष्टांनंतर मला माझ्या स्वप्नातली नोकरी मिळाली. १७ जुलै २००७ ला मी पुणे विद्यापीठ, संगणक शास्त्र विभागातून फेलो पदाचा राजीनामा देवून symantec  या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी स्वीकारली. मनासारखा पगाराचा आकडा, खूप प्रसिद्ध तंत्रज्ञानावर काम करायची संधी, अतिशय आरामदायी सुविधा. मी तर जाम खूषच होतो. एकंदरीतच कुठल्याही अभियंता पदाविधाराकाचे स्वप्ना असावे असे सर्व काही मिळवत मी माझ्या करियर ची वाटचाल करतो आहे अशी स्वतःची समजूत काढत मी ऑफिसात जायला पहिल्याच दिवशी तयारी करून निघालो.
माझे ऑफिस बाणेर (पुणे) मध्ये आहे आणि राहतो खडकीत. आणि माझ्या कंपनीकडून  जाण्या येण्याची सुविधा आहे. बोपोडीच्या IT पार्क पासून बाणेर च्या ऑफिस पर्यंत मी कंपनीच्या वाहनातून जातो. पहिल्याच दिवशी मी IT पार्क ला सकाळी ७.३० ला पोहोचलो तेव्हा मला एक सफाई कर्मचारी स्त्री दिसली. स्त्री कसली, एखादी १७ – १८ वर्षांची मुलगीच असावी ती. खूप लवकर संसाराचे ओझे अंगावर घेऊन वावरणारी. अंगकाठीने अतिशयच कृश, तिच्याकडे बघूनच कुणालाही तिच्या गरीब संसाराची जाणीव व्हावी. तिथे IT  पार्क मध्ये जमा झालेला कचरा खूप मोठ्या मोठ्या  प्लास्टिक च्या पिशव्यांमध्ये  भरून ठेवलेला असे आणि त्या स्त्री चे काम होते, त्या सर्व पिशाव्या उचलून बाहेर रस्त्यावर आणून ठेवायच्या आणि मनपा ची कचरा वाहून नेणारी गाडी आली की सर्व कचरा त्या गाडीत भरून द्यायचा. ती स्त्री ते काम अतिशय शांतपणे करत होती. कितीतरी पिशाव्या तिच्या शरीराच्या मानाने अतिशय जड होत्या, त्या उचलतांना तिची होणारी फरफट, आणि तरीपण तिची कामाबद्दलची चिकाटी, सहनशीलता पाहून कुणाही संवेदनशील माणसाला गलबलून यावे असेच ते दृश्य होते.

ते सर्व पाहून मला खरोरच खूप वायीट वाटू लागले. आपण घेतलेले शिक्षण, आपण मिळवतो ती कमाई, आरामदायी आयुष्य या सगळ्यांचा विचार करून कसं-कसंच वाटायला लागलं. आपल्या समाजातील कितीतरी मोठा वर्ग असा आहे की जो कायम मूळ सोयी-सुविधांपासून वंचित राहिला आहे. मीही त्याच वर्गातून आलो आहे, पण मला आधार होता शिक्षणाचा, संस्कारांचा, चांगल्या विचारांचा, पण त्यांचे काय ज्यांना या सर्व गोष्टींविषयी जाणीव सुद्धा नाही. ज्याचे पूर्ण आयुष्य फक्त फरफटतच गेले. डोक्यात विचारांचं काहूर मजू लागलं.
इतक्यात ती स्त्री आपल्या डोक्यावरचं ओझं बाजूला ठेवून, कुठेतरी दुसरीकडे घाई घाई ने जावू लागली. मी कुतूहलाने बघू लागलो. पुढे एका कोपऱ्यात एका संगणकाच्या monitor चे एक मोठे खोके ठेवलेले होते आणि त्यात एक लहान बाळ, ( ५-६ मानिन्याचं असेल) रडत होतं. तिने त्याला पटकन उचलून घेतले आणि त्याला घेवून ती खेळवू लागली. आईचा प्रेमळ स्पर्श होताच ते बाळ ही रडायचं थांबलं. आणि आई कडे बघून हसू लागलं. आपल्या बाळाचे हसू पाहून तिच्या चेहऱ्यावर उमटलेले गोड, आनंदी, हसरे भाव. बाळाकडे पाहून तिचे त्याच्यात हरवून जाणं आणि त्याला खेळवतांना तिला होणारा आनंद सर्व काही अतुलनीय होतं. तो निरागस आनंद, ते समाधानाचे भाव काहीही देवून विकत मिळणार नाहीत असेच होते. आपल्या बाळाकडे पाहून ती सारे कष्ट विसरली होती, आणि आपला खरा आनंद त्याच्यात शोधत होती.
मग मीही मनाशीच हसलो आणि स्वतःलाच समजावू लागलो, की आनंद-दुःख, जय-पराजय, चांगले-वायीट या कालपरत्वे, व्यक्तीपरत्वे  बदलणाऱ्या संज्ञा आहेत. इथे कुणीही, खरा आनंदी, खरा दुःखी असा नाहीच आहे मुळी. प्रत्येकाच्या आनंदाच्या, सुखाच्या कल्पना वेगळ्या आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक जण आपापल्या परीने आनंद शोधतच असतो. मग जर मी म्हणत राहिलो की चांगली नोकरी मिळाल्यावर, मी आनंदी होयील, नोकरीत बढती मिळाल्यावर, अमेरिका वारी झाल्यावर, घर घेतल्यावर, लग्न झाल्यावर, मुलं झाल्यावर … ही यादी न संपणारी आहे. आयुष्य संपून जाईल पण यादी नाही संपणार. मग आपलं आपणच का नाही ठरवायचं

” हर पाल यहाँ, जी भर जियो,
जो है समाँ, कल हो ना हो”.
त्या माय लेकाचा प्रेमाचा सोहळा पाहतांना माझी गाडी कधी आली ते कळलेच नाही. मग driver  ने वाजवलेला होर्न ऐकून मी जागा झालो आणि माझ्या ऑफिस चा पहिला दिवस साजरा करायला निघालो.
“In the Pursuit of HAPPYNESS” !!!

Advertisements

2 thoughts on “सुखाच्या शोधात

  1. Mahesh A. Sale says:

    आई आणि बाळाच वर्णन वाचताना अंगावर काटा आला. खरच, समाधान मानण्यात आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s